PostImage

Zadipatti VC News and Business

Nov. 16, 2024   

PostImage

सावली येथील युवकांचा मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश


सावली

 सावली शहरातील प्रभाग क्रमांक 02 व प्रभाग क्रमांक 04 येथील युवा होतकरू युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या धोरनांवर विश्वास ठेवत आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024 ला ब्रह्मपुरी-सावली-सिंदेवाही  विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार कृष्णलाल सहारे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. त्यात प्रफुल्ल गोंगले
नितेश बोरकर,साहिल रामटेके,रोहित कोसनकर,अमन खोब्रागडे,सुमित शंभरकर यांनी महायुतीचे उमेदवार कृष्णालाल सहारे यांच्या हस्ते भाजपाचा दुप्पटा टाकून  प्रवेश देण्यात आला. युवकांनी केलेल्या प्रवेशाचे सर्वानी स्वागत करून आनंद व्यक्त केले.यावेळी सावली तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका नीलम सुरमवार, सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,जेष्ठ नेते नंदकिशोर संतोषवार, मनोज अमरोजवार सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 16, 2024   

PostImage

आदिवासी परधान समाज मंडळा तर्फे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती …


 

गडचिरोली :- दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आदिवासी परधान समाज मंदीर गडचिरोली येथे आदिवासिंच्या  जल, जंगल, जमीन यासाठी इंग्रजांविरुद्ध  प्रखर संघर्ष करणाऱ्या भगवान बीरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून 
प्रियदर्शन मडावी, जिल्हाअध्यक्ष आदिवासी टाइगर सेना, अध्यक्षस्थानी आदीवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी , प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. किर्तिकुमार उईके ,महेश गेडाम,मुल, ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम, सुरज शेडमाके , गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह, विनोद सुरपाम, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे, महेंद्र मसराम हे होते.
 सर्वप्रथम आदिवासी जननायक क्रांतीसुर्य, धरतीआबा, भगवान बिरसा मुंडा  यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी समाज मंडळाचे युवा सदस्य अजय सुरपाम, आदिवासी एकता युवा समितीचे उपाध्यक्ष सुधीर मसराम,युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम, नंदकिशोर कुंभारे,गणेश मेश्राम, टाइगर ग्रूप सदस्य आकाश कुळमेथे, अनिकेत बांबोळे, मुकुंदराव उंदीरवाडे, राज डोंगरे, राकेश कुळमेथे, विक्की मसराम,योगेश कोडापे,नितीन शेडमाके,अंकित कुळमेथे, सुरज गेडाम, साहिल शेडमाके,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल गोवर्धन,ताजिसा कोडापे, महिला सदस्य शालू सुरपाम, शोभा शेडमाके, गंगा सलामे, सुनिता मसराम, प्रफुला जुनघरे,वनिता कोडापे, निरुता कोडापे, सोनाली सुरपाम, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर मसराम यांनी केले तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 15, 2024   

PostImage

Gadchiroli news: 3 परिचारिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढली छेड


 भामरागड: येथील ग्रामीण रुग्णालयात तीन प्रशिक्षणार्थी परिचारिकांची सहकारी कर्मचाऱ्यांकडूनच छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार १३ नोव्हेंबरला उजेडात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

नव्याने भरती झालेल्या परिचारिकांना प्रशिक्षणार्थी म्हणून विविध आरोग्य केंद्रांत पाठविण्यात आले आहे. त्यानुसार भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविलेल्या तीन परिचारिकांसोबत हा किळसवाणा प्रकार घडल्याने संतापाची लाट पसरली आहे. या परिचारिकांनी ग्रामीण रुग्णालयातील महिला तक्रार निवारण समितीसह वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेत तिघांनाही ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त करून जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेकडे पाठवले आहे. या तिघांवर काय कारवाई होते, याकडे आरोग्य वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

 

भामरागड येथील घटनेची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कार्यालयीन तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करून अहवाल मागवला आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.

-डॉ. माधुरी किलनाके,

जिल्हा शल्यचिकित्सक

 

यांच्याविरुद्ध आहे तक्रार प्रयोगशाळा तंत्रज्ञ

 

एका परिचारिकेच्या तक्रारीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी तिला खांद्यावरहात ठेवून कानात मला तू आवडते,असे म्हटला.

 

कनिष्ठ लिपिक खोकल्याचे औषध मागण्याच्या बहाण्याने परिचारिकेला बोलावून घेतले. त्यानंतर जवळ खुर्चीत बसवून आक्षेपार्ह संभाषण केले. १० नोव्हेंबर २०२४ला ही घटना घडली.

 

वैज्ञानिक सहाय्यक

प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीस फोन करून १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तू साडीवर खूप छान दिसते, असे म्हटला.

 


PostImage

Zadipatti VC News and Business

Nov. 14, 2024   

PostImage

संत्रानगरी नागपूर येथे झाडीपट्टीच्या नाटकाचा सन्मान


  गडचिरोली -                

              महाराष्ट्राची उपराजधानी व संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी 'साहित्य विहार उत्कृष्ट वांड्.मय  पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या २५ साहित्यिकांना नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते. 
        महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या  पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "महापूजा " या नाटकास नाट्यलेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे साहित्य विहार संस्थेचे सचिव सौ. मंदा खंडारे व अध्यक्षा सौ. आशाताई पांडे यांनी पत्राद्वारे कळविले असून  ३० नोव्हेंबरला दु. २ ते ५ या वेळात बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटल, शंकर नगर, नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रतिथयश शिक्षणतज्ञ डॉ. विनायक देशपांडे आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे हस्ते तसेच ज्ञानयोगी सन्मानाचे मानकरी डॉ. म. रा.जोशी व साहित्य विहार च्या अध्यक्ष ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक आशा पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
      'महापूजा' हे सन २००२ ते २०१० या कालावधीत संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी या नाटकात काम केले आहे . झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत .
           विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके"  व "धरती आबा क्रांतीसुर्य - बिरसा मुंडा" या दोन नाटकांना  विविध स्तरांवर नाट्यलेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'महापूजा' या महानाट्यास मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे.
                चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक),  मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),  व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 7, 2024   

PostImage

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आदेश


 

गडचिरोली,दि.7:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (20 नोव्हेंबर 2024) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री दैने यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 6, 2024   

PostImage

दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा …


दि

गडचिरोली:-दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला.

महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत घालवण्याकरिता सुचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली अंतर्गंत कार्यान्वित असलेल्या लोकमंगल या स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालकांसोबत दिवाळीतील एक दिवस जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची भेट घेवून दीपावली उत्सव साजरा करण्यात आला.
              दिनांक 05 नोव्हेबर 2024 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गंत कार्यान्वित असलेल्या अहिल्यादेवी बालसदन घोट येथील बालकांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या दालनात बालकांसोबत भेट घेवून दिवाळी उत्सव साजरा करण्यात आले.  उपजिल्हाधिकारी प्रसेनजित प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, तहसिलदार सुरेंद्र दांडेकर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिरीश कावळे यांनी बालकांसोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेली आवड, निवड, छंद, जाणून घेतली व व्यक्तीमत्व विकास, प्रेरणादायी पुस्तकाचे नाव सांगुन वाचन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करुन बालकांचा आंनद द्विगुणित करण्यात आला.
               त्यानंतर जिल्हा परिषद गडचिरोली येथे भेट देण्यात आली. अतिरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी बालकांना दिपावलीच्या शूभेच्छा देवून प्रशासकीय कामकाजाविषयक माहिती देवून आयुष्याला दिशा देणारी पुस्तकाचे वाचन करावे तसेच चांगल्या सवयी लावावे असे मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या निवासस्थानात भेट घेण्यात आली. श्रीमती आयुषी सिंह यांनी प्रत्येक बालकासोबत संवाद साधुन त्यांच्यात असलेलल्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. त्यानंतर बालकांनी आयुषी सिंह यांच्या सोबत स्हेन भोजनाचा आनंद घेतला. बालकांना फराळ देवून एक दिवशीय दिपावली उत्सवाचा आनंद घेतला. 
        जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी सहकुटुंब सर्व बालकांना डायरी, पेन भेटवस्तू व फराळ देवून सहकुटुंब बालकांसोबत दिपावली उत्सव साजरा केला.
          सदर उपक्रम जिल्हाधिकारी संजय दैने व मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या नियंत्रणात राबविण्यात आला. यावेळी उपस्थित अर्चना इंगोले उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जि.प., बाल कल्याण समितीचे सदस्य काशिनाथ देवगळे, सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, उदधव गुरनुले विस्तार अधिकारी जि.प., लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष शायनी गर्वासीस, अहिल्यादेवी बालसदन घोट येथील अधिक्षिका ललिता कुज्जुर, बाल सरंक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुर, पियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, माहिती विश्लेषक उज्वला नाकाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख, व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
           अशा प्रकारे दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत घालवून प्रशासकीय कामकाज बद्दल माहिती देवून बालकांना संबोधन केले. आणि त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने संवाद साधून प्रशासकीय अधिकारी होण्याकरिता काय करावे लागते त्याची संपूर्ण माहिती बालकांनी जाणून घेतली अशा आगळावेगळा कार्यक्रम घेवून बालकांना खरी दिपावली उत्सवाचा आनंद घेता आला. सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास विभागाने सदर उपक्रम राबविला.
0000


PostImage

MH 33 NEWS

Nov. 6, 2024   

PostImage

निवडणूक निरीक्षक यांची आरमोरी विधानसभा मतदान केंद्रांची पाहणी


निवडणूक निरीक्षक यांची आरमोरी विधानसभा मतदान केंद्रांची पाहणी

गडचिरोली,(जिमाका),दि.6: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (सामान्य), विनीतकुमार यांनी काल 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील विसोरा येथील मतदान केंद्र क्रमांक 101, 102, 103 व 104 तसेच देसाईगंज येथील महिला (पिंक) मतदान केंद्र क्रमांक 132 (नैनपूर वार्ड) तसेच दिव्यांग मतदान केंद्र क्रमांक 125 इत्यादी मतदान केंद्रांनी भेटी देऊन मतदान केंद्रांची पाहाणी केली व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्रुटींबाबत मार्गदर्शन करुन सदर त्रुटी दुर करणेबाबत निर्देश दिले.
 यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मानसी, उपविभागीय अधिकारी कुरखेडा, रणजीत यादव, निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांचे संपर्क अधिकारी ए.के.बकालिया, नायब तहसिलदार, विलास तुपट, निवडणूक महसुल सहायक महेंद्र मेहर प्रामुख्याने उपस्थित होते. असे स्विप व मीडिया नोडल अधिकारी, देसाईगंज श्रीमती प्रणाली खोचरे यांनी कळविले आहे.
0000


PostImage

MH 33 NEWS

Nov. 5, 2024   

PostImage

निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण



गडचिरोली :- निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे खर्चाचे लेखे किमान तीन वेळा तपासणी करीता निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना खर्च तपशिलाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके भरण्याबाबत आज प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यावेळी उपस्थित होते.            
या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक विषयक सादर करावयाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके यांचे नमुने कोणते व कशाप्रकारे भरल्या गेले पाहिजे, याबाबत प्रात्याक्षिकाचे माध्यमातून सहायक खर्च निरीक्षक तथा अप्पर कोषागार अधिकारी दीपक उके, पथक प्रमुख (लेखा) तथा सहायक लेखाधिकारी महेश कोत्तावार यांनी समजावून सांगीतले. तसेच उपस्थित उमेदवार व त्यांचे प्राधिकृत प्रतिनीधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली.  67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक खर्च विषयक तपासणी दिनांक 7, 13 व 19 नोव्हेंबर रोजी नगर परीषद सभागृह देसाईगंज येथे होणार आहे. ठरलेल्या दिनांकास मुळ नोंदवहया व प्रमाणके तपासणीकरीता सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. तसेच मुळ नोंदवहया व प्रमाणके सादर न केल्यास निवडणूक आयोगाद्वारे होणारी संभाव्य कार्यवाही, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.


PostImage

MH 33 NEWS

Nov. 4, 2024   

PostImage

मतदान अधिकाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 972 मतदान केंद्रासाठी 1084 …



गडचिरोली दि.4 :-विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.
  67- आरमोरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनित कुमार,  68- गडचिरोली निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, नोडल अधिकारी शेखर शेलार, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी आदी यावेळी उपस्थित होते.  
मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक २ व मतदान अधिकारी क्रमांक ३ यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात 10 टक्के अधिकाऱ्याची अतिरिक्त निवड करण्यात आली आहे.  आरमोरी विधानसभा मतदार संघात 310 मतदान केंद्रासाठी 346 मतदान पथके, गडचिरोली विधानसभा मतदार संघात 362 मतदान केंद्राकरिता 403 मतदान पथके आणि अहेरी विधानसभा मतदार संघाकरिता 300 मतदान केंद्रासाठी 335 मतदान पथके असे जिल्ह्यात एकूण 972 मतदान केंद्रासाठी 1084 पथकांची निवड करण्यात आली. एका पथकात 4 अधिकारी राहतील.
आरमोरी क्षेत्राकरिता 1376 पुरूष, 8 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली क्षेत्राकरिता 1604 पुरूष व 8 महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता 1332 पुरूष व 8 महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
000


PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 30, 2024   

PostImage

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र करीता आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे अर्ज दाखल


ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे  ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जमलेल्या अफाट जनसमुदायास संबोधित करतांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान. तसेच नामांकन दाखल करण्यासाठी अफाट जनसमुदायासह बैलगाडीवर स्वार होऊन जातांना छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंशजी बघेल, काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेस नेते मुन्ना ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्र उमेदवार संतोषसिंह रावत, ॲड, राम मेश्राम, संदिप गड्डमवार, प्राचार्य जगनाडे, खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकार, डॉ.राजेश कांबळे,विलास विखार, दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमूरकर, रमाकांत लोधे, नितिन गोहने, आदिवासीं नेते अवचितराव सयाम, ॲड.गोविंद भेंडारकर, धीरज शेडमाके, यशवंत दिघोरे, तसेच महिला आघाडी, युवक काँग्रेस, एनएसयुआय, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने  ब्रह्मपुरी विधानसभेतील जनसमुदाय उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 28, 2024   

PostImage

आचारसंहितेचा फटका झाडीपट्टी नाटकांवर


गडचिरोली जिल्हा हा झाडीपट्टी नाट्य रंगभूमी क्षेत्र म्हणून ओळखला जात असतो. या झाडीपट्टीमध्ये जवळपास भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे मोडत असून या जिल्ह्यामध्ये दिवाळी मध्ये नाटकाचे प्रोग्राम होत असतात. परंतु यावर्षी आलेल्या आचारसंहितेमुळे यावर्षीची सीजन नाट्यकलावंतांची, नाट्यसंगीत देणारे वादक, तसेच नाटकातील छोटे-मोठे काम करणारे आणि डेकोरेशन यांना यावर्षीची सीजन ही करता येणार नाही कारण की यावर्षी आलेल्या ह्या आचारसंहितेचा फटका बसला असून ह्या आचारसंहितेमध्ये कोणतेच नाटक होणार नाही हे आता निश्चित झाले आहे. तरी पण नाट्य कलावंत संघटना गडचिरोली, लेखक संघटना वडसा- देसाईगंज आणि साकोली-भंडारा नाट्य कलावंत संघटना यांनी आपापली प्रयत्ने सुरू ठेवलेली आहे.परंतु अजून पर्यंत नाटकांना परमिशन मिळालेली नाही त्यामुळे नाट्य कलावंतांमध्ये निराशाची भावना व्यक्त होऊन राहिली आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 28, 2024   

PostImage

भारतीय जनता पार्टीनी दिली तरुणांना संधी


 

    भारतीय जनता पार्टीने सावली तालुक्यात सर्वात मोठी कामगिरी तरुणांच्या हाती दिली.

           भारतीय जनता पार्टीने मोठमोठे पद त्यामध्ये युवा तालुका अध्यक्षपदी नितीन कारडे यांना नियुक्त करून तालुक्याची सर्व धुरा यांच्या हाती सोपवल्या असून भारतीय जनता युवा मोर्चा तालुका महामंत्री पदी विशाल करंडे आणि भारतीय जनता युवा मोर्चा तालुका महामंत्री पदी अंकुश भोपये यांची नियुक्ती करून जनतेचा आणि युवकांचा कल वाढवण्याचे काम केले आहे.

       युवा कार्यकर्त्यांच्या संपर्कांनी येत्या निवडणुकीमध्ये सर्व सूत्रे युवा कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. म्हणून सर्वत्र चर्चा सुरू आहे तसेच युवा सदस्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 28, 2024   

PostImage

गडचिरोली येथुन ढोल ताशांच्या गजरात महा रँलीला सुरुवात


 

दिं.२८ आक्टोंबर

गडचिरोली -६८, विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मान.श्री. डॉ. मिलिंद जी नरोटे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी माजी खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली ते तहसील कार्यालय,  पर्यंत आयोजित ‛भव्य नामांकन फार्म भरण्यासाठी महारॅली’ त माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे गडचिरोलीत नामांकन दाखल करण्यासाठी पुष्पगुच्छाने स्वागत व विजयी भव असे अभिनंदन करत भाजपा महायुतीच्या   काढलेल्या महारँलीत प्रचंड जनसमुदायात सहभागी व उपस्थित झाले.
 
यावेळी विधान परिषदेचे आमदार  मान.डॉ. परिणयजी फुके, जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र जी ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणयजी खुणे,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रविंद्र जी वासेकर,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,समन्वयक प्रमोदजी पिपरे, राष्ट्रवादी युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,जेष्ठ नेते सुधाकरराव येंनगदलवार,जिल्हा सचिव रंजिताताई कोडापे, नंदकिशोर काबरा,कीर्तीकुमार मासुरकर तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Oct. 22, 2024   

PostImage

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने चुडाराम बल्हारपुरे पुरस्कृत


गडचिरोली -              

       मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (मुंबई)  या प्रसिद्ध संस्थेतर्फे 'राज्यस्तरीय  उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा'  आयोजित करुन विजेत्या साहित्यिकांना श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
        अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावर्षी राज्यभरातील एकूण ३५९ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकूण १४ साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची निवड करण्यात आली.  त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ' या नाट्यकृतीची नाट्यलेखनाच्या प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
        यावेळी सरस्वती साहित्य पुरस्काराने सन्मानित व दलित साहित्य चळवळीत अग्रक्रमी मानाचे स्थान असलेले,'अक्करमाशी'  'उपल्या' इ. साहित्याने संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे हस्ते, ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त व प्रसिद्ध साहित्यिक दा. कृ. सोमण, अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांचे उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या " धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकाचे लेखनासाठी "श्रीस्थानक साहित्य पुरस्कार -२०२३" या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने साहित्य परीक्षक महादेव गायकवाड, किरण बर्डे, संजीव फडके, निर्मोही फडके, सदाशिव टेटविलकर, शुभांगी गान, र. म. शेजवलकर, निशीकांत महाकाळ, दा.कृ. सोमण, वृंदा दाभोळकर, मानसी जोशी, अस्मिता चौधरी, वृषाली राजे, प्रतिभा चांदूरकर, दुर्गेश आकुरकर, चांगदेव काळे (कार्याध्यक्ष) इ. मान्यवर उपस्थित होते. 
         याप्रसंगी माहे फरवरीमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सौ. तारा भवाळकर यांचेसह विजेते साहित्यिक झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे, प्रतिभा सराफ, गीतेश शिंदे, ऋषिकेश गुप्ते, अंजली जोशी, डॉ.उदय निरगुडकर, गजानन देवधर, पांडुरंग बलकवडे, डॉ. पद्माकर गोरे, श्रीधर दीक्षित, डॉ. गिरीश पिंगळे, शुभदा सुरंगे,  लक्ष्मीकांत धोंड इ. साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले.
         कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध साहित्यिका निर्मोही फडके यांनी केले. 
          चुडाराम बल्हारपुरे यांच्या या  नाटकाला यापूर्वी साहित्य प्रज्ञामंच, पुणे या संस्थेचेही नाट्यलेखनाचे प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहे. 
                 चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, डॉ. प्रा. श्याम मोहरकर, डॉ.प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ.प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, प्रा. यादव गहाणे, मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), आदिवासी साहित्यिक प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, व नंदकिशोर नैताम, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, तसेच इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 21, 2024   

PostImage

राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव …


 


गडचिरोली:- राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आगार व्यवस्थापक श्री राकडे साहेब.बस स्थानक प्रमुख रामटेके साहेब,प्रमुख पाहुणे गुलाबराव मडावी,अरूनभाऊ पेंदाम वा.निरी.पूजा सहारे.नितेश मडावी,भास्कर आत्राम,तुळशीराम मेश्राम,विष्णुदास कुमरे,सुधीर मेश्राम,रामचंद्र सोयाम,गणेश कोडापे,जयभारत मेश्राम,सुरेश सिडाम,सुरेश कोवे,नामदेव मेश्राम, पवन वनकर,अशोक सुत्रपवर,प्रकाश मडावी, स.वा. निरी. धाडसे,नरड मॅडम,गीता मेश्राम,सुलोचना जुमनाके,माणिकशाह मडावी,दीपक मांडवे,अशोक नैताम,राजू मडावी,सुनील कुंभमवार उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 16, 2024   

PostImage

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसची …



गडचिरोली:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.


PostImage

MH 33 NEWS

Oct. 10, 2024   

PostImage

गडचिरोलीच्या आय टी आय ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जी यांचे …


नामकरणाची मागणी मंजूर केल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

 

गडचिरोली:-गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके करण्यात यावे ती मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी  यांनी शासन स्तरावर केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर  यश मिळाले असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे .   या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिनांक ११  ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांचे आभार मानले आहे.


PostImage

M S Official

Sept. 30, 2024   

PostImage

Gadchiroli News: ब्रेकिंग न्यूज: सावधान! गडचिरोली जवळील सेमाना देवस्थान परिसरात …


Gadchiroli News: गत तीन वर्षांत प्रथमच रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोली शहराची सीमा रविवारी ओलांडली. दुपारी मसली परिसरात व सायंकाळी वाकडी आणि सेमाना देवस्थानच्या मध्यवर्ती जंगलात हा कळप दिसून आला. त्यामुळे वनविभाग आणि हुल्ला टीमला चामोर्शी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवावी लागली.

हे देखील वाचा: Government New Rules: 1ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये होणार बदल! या योजना बाबत सरकार घेणार मोठा निर्णय

मागील आठ दिवसांपासून या रानटी हत्तींचा कळप पोर्ला वनक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत होता. या काळात नवरगाव, कोडना, साखरा, गोगाव, महादवाडी, कुऱ्हाडी या भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी या कळपाने गोगावलगतच्या नागोबा देवस्थान परिसरात पीक तुडवले. त्यानंतर रात्री खरपुंडी गावाजवळची कठाणी नदी ओलांडून सालईटोला गावाच्या बाजूने माडेतुकूम परिसरातून गडचिरोली- धानोरा मार्ग ओलांडला.

हे देखील वाचा: Post Office Scheme: पोस्ट ऑफिस में हर महीने ₹500 जमा करने पर 5 साल में मिलेगा इतना रिटर्न, जानें पूरी जानकारी

टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरातून हा कळप पोटेगाव मार्गाच्या दिशेने मसली गावात गेला. रविवारी दुपारपर्यंत हा कळप याच भागात होता, आणि सायंकाळी त्यांनी सेमाना उद्यान ते वाकडी फाट्याच्या मधल्या जंगलातून चामोर्शी मार्ग ओलांडला. हत्तींचा रोख मुडझा गावाच्या दिशेने होता. वनविभागाच्या पथकाने हत्तींच्या हालचाली पाहून वाहतूक बंद केली आणि नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेची सूचना दिली.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 29, 2024   

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत ऊकंडराव नारायण राऊत विजयी


   गडचिरोली 

          स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे एकोणचाळीसावे  सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी श्री. ऊकंडराव नारायण राऊत यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "अर्धांगिनी" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          श्री. ऊकंडराव नारायण राऊत हे पोर्ला (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद गडचिरोली येथून केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना भजनाची व गाण्याची विशेष आवड असून नवोदित कवी आहेत. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गीते तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या एकोणचाळीसाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी. एस. बनसोडे, पुनाजी कोटरंगे, गजानन गेडाम,  अजय राऊत,  गणेश रामदास निकम, संगीता ठलाल,  तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे, रेखा दिक्षित, प्रिती ईश्वर चहांदे, वामनदादा गेडाम, सोनाली रायपुरे - सहारे, डॉ. मंदा पडवेकर, लता शेंद्रे, मुरलीधर खोटेले, रोहिणी पराडकर, वंदना मडावी, वंदना सोरते, सुरेश गेडाम, यामिनी मडावी, कृष्णा कुंभारे, सुभाष धाराशिवकर, सुनिल चडगुलवार, सिध्दार्थ गोवर्धन, सोनू अलाम, विलास टिकले, ऊकंडराव नारायण राऊत, पुरुषोत्तम दहिकर, चरणदास वैरागडे,  शैला चिमड्यालवार, ज्योत्स्ना बंसोड, केवळराम बगमारे,  खुशाल म्हशाखेत्री, पी.डी.काटकर,संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 26, 2024   

PostImage

जरावंडी ग्रामपंचायतचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर


जारावंडी परिसरातील अत्यंत ज्वलंत समस्या घेऊन व मागण्यान्ची पूर्तता व्हावे.या भावनेने मा. मुकेशभाऊ कावळे ग्रा. पं. सदस्य जारावंडी यांच्या पुढाकारातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे  विवीध मागन्या साठी निवेदन सादर करण्यात आले व काही ग्राम पंचायत स्थरावरील समस्यांसाठी CEO गडचिरोली  याना सुद्धा निवेदन देण्यात आल

ग्रामपंचायत जाराववंडी तर्फे आठवडी बाजार भरतो त्या बाजारात पावसाळ्याच्या वेळेस गड्डे पडून त्या खड्ड्यामध्ये पाणीच भरतो आणि चिखलाचे पण साम्राज्य असते त्यामुळे ग्राहकांना आणि दुकानदारांना नाहक त्रास होत आहे. जवळपास 15 ते 20 गावांचा त्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असून त्यावेळेस दुकानदारांना ग्राहक मिळत नसल्यामुळे दुकानदार नाराजी व्यक्त करत आहेत .

     हे निवेदन सादर करताना जारावंडी परिसरातील प्रतिष्ठित नागरीक जिल्हा कार्यालयात उपस्थित होते त्यात प्रामुख्याने मान. जयेंद्रजी पवार, अध्यक्ष आ.वि.का. संस्था जारावंडी,संतोष मडावी उपसभापती (आ.वि.का. संस्था) हरिदासजी टेकाम माजी सरपंच, दयाराम सिडाम,गुरुदास टींगुसले, रेश्मा सुरपाम,शीतल शेडमाके,मालता मोहूर्ले सह जारावंडी तिल बहुसंख्येने महिला 
उपस्थित होते.